महाराष्ट्राच्या हद्दीत घुसून तेलंगणा पोलिसांची वाहनांवर कारवाई
चंद्रपूर : खरा पंचनामा
महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवत तेलंगणा प्रसाशानाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सीमेत येऊन तेलंगणा पोलीस वाहनावर कारवाई करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पोडसा या गावातील गावकरी चांगलेच संतापले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत दोन राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल आहे. याच पुलावरून माल वाहतूक होत असते. त्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे संबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जात होते. मात्र तेलंगणा प्रशासनाच्या एका कृतीने या संबंधाला तडा जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातून होणाऱ्या वाहतुकीमुळे तेलंगणा राज्यातील मार्गाचे नुकसान होत असल्याचा जावईशोध तेलंगणा प्रशासनाने काढला आणि त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याच्या सीमेत पोलिसांना पाठवून वाहतूक बंद केली. यामुळे सीमा भागातील नागरिक चांगले संतापले आहेत.
यासंदर्भात तेलंगणा राज्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टोल टॅक्स वाचवण्यासाठी पोडसा-सिरपूर मार्गाचा वापर केला जात आहे. यामुळे ही कारवाई केली जात आहे. पण ट्रकचालकांना रस्त्याचे कारण सांगून परत पाठवले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.