Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा!

शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा!



मुंबई : खरा पंचनामा

नागपुरातील हिंसाचाराचा सूत्रधार अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे नेता फहीम खानच्या घरावर आज (२४ मार्च) बुलडोझरची कारवाई करण्यात आली. फहीम खानच्या घरातील बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला.

फहीम खान सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्या घराचा बेकायदेशीर भाग पाडण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने हे बांधकाम बेकायदेशीर ठरवत फहीम खानला 24 तासांच्या आत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. हिंसाचारातील आरोपीच्या मालमत्तेवर महापालिका बुलडोझर चालवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारचे आभार मानताना शिवरायांवर गरळ ओकून फरार झालेला प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या बेकायदेशीर बाबींची चौकशी करून बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान व खोक्या भोसलेच्या बेकायदेशीर घरावर कायदेशीर बुलडोजर चालवून धडा शिकविल्याबद्दल आभार. मात्र छ. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवावे. त्यांनी जनभावना असाही टॅग ट्विटमध्ये वापरला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.