सराईत गुंडाने पोलीस चौकीत अंगावर ओतून घेतले पेट्रोल!
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना केली धक्काबुक्की
पुणे : खरा पंचनामा
आपली तक्रार न घेता विरोधकांची फिर्याद घेतल्याने रेकॉर्डवरील गुंडाने भर पोलीस चौकीत स्वतः च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस व्हॅनवर डोके आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत खडक पोलिसांनी बुचड्या ऊर्फ अभिषेक ससाणे, कुणाल ससाणे यांना अटक केली आहे. अभिषेक ससाणे याची आई, पत्नी, मावशी, मित्र दांड्या उर्फ विवेक आडागळे व इतर २ ते ३ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघा भावांना ससून रुग्णालयात नेत असताना त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील बंदोबस्तावरील पोलिसांना उद्देशुन आता तुमच्याकडे पाहतो, सीसीटीव्ही फुटेज मागवितो व तुमचे जीने हराम करणार, असे बोलून अरेरावी करत तुमच्या नोकर्या घालवितो, असे बोलून दमदाटी करत होता.
हा सर्व प्रकार लोहियानगर पोलीस चौकी येथे व ससून रुग्णालयात सोमवारी रात्री पावणे बारा ते मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु होता. याबाबत पोलीस अंमलदार संतोष साबळे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर येथील किराणा दुकानदार नदीम मेहमुद खान यांच्या फिर्यादीवरुन अभिषेक ससाणे व विवेक आडागळे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करीत येण्यात येत होता. सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बुचड्या ऊर्फ अभिषेक ससाणे व त्याचा मित्र दांड्या ऊर्फ विवेक आडागळे हे दोघे लोहियानगर पोलीस चौकी येथे आले. पोलीस चौकीच्या दारामध्ये गाडी लावून बाहेरुनच माझी तक्रार घ्या, असे मोठमोठ्याने ओरडत आले.
दांड्या हा मोबाईलवर रेकॉडिंग करत होता. टपरीवाला बाबु व त्याच्या टपरीतील काम करणारा मुलगा यांनी मला तलवारीने मारण्याची धमकी दिली असे सांगू लागला. चौकीच्या बाहेर आत ये जा करुन जोरजोराने बोलू लागला. त्याला शांत बसायला सांगितले तर तो जोरजोराने वाद घालू लागला. मोठमोठ्याने पोलीस चौकीसमोर शिवीगाळ करु लागला. काही वेळाने तो निघून गेला. त्यानंतर रात्री साडेबारा नंतर तो पुन्हा त्याची आई, मावशी, बायको, दांड्या व इतर नातेवाईक यांच्यासह आला. हातामध्ये पेट्रोलची बाटली व काडेपटी घेऊन चौकीत आला. पोलीस माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, असे बोलून चौकीमध्ये स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला समजावुन त्याची काय तक्रार आहे, ते सांग तुझी तक्रार घेतो, असे सांगत होते. तरी काही एक न ऐकता माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा टाकला. पोलीस सगळे मिळालेले आहेत. माझी तक्रार घेतली नाही असा खोटा आरडाओरडा करु लागला. त्याच्या बरोबरच्या महिलाही आरडाओरडा करु लागल्या.
त्यानंतर तो चौकीच्या गेटच्या बाहेर गेला. मी स्वतःला जाळून घेतो व सर्व पोलिसांची नावे घेतो, अस म्हणू लागला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडून पोलीस चौकीत आणले. त्याचा भाऊ कुणाल ससाणे ही पोलीस चौकीत आला. तोही आरडाओरडा करु लागला. चौकीतील पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांना बोलावून घेतले. ते समजावून सांगत असताना चव्हाण यांच्या अंगावर तो धावून गेला. त्यांची नेमप्लेट तोडली. पोलीस अंमलदार प्रशांत बडदे हा गेला असताना दोघांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या शर्टच्या खांद्यावरील रँकपट्टी ओढून फाडली. त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले असल्याने त्याला मेडिकलसाठी ससून रुग्णालयात न्यायचे होते.
त्याला घेऊन पोलीस जात असताना त्याने खडक पोलीस ठाण्याच्या वाहनावर स्वतःचे डोके आपटून घेऊ लागला. त्याच्याबरोबर आलेल्या महिला व इतर नातेवाईक पोलिसांना वाईट शिवीगाळ करु लागले. त्याला ससून रुग्णालयात नेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिसांना सांगून ससून रुग्णालयात जादा बंदोबस्त मागवून घेतला. तेथेही त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.