Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधानभवनात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधानभवनात अभिवादन



मुंबई : खरा पंचनामा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. 

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधिमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.