मिरजेतून स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या कर्नाटकमधील दोघांना अटक
महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील निपाणीकर कॉलनीतील एका अपार्टमेंटच्या पार्किंगधून स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या कर्नाटक राज्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आली आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.
संजू यमनाप्पा मादर (वय २३, रा. कोलार, ता. कोलार, जिल्हा विजापूर), चंद्रशेखर ऊर्फ चेतन मल्लाप्पा मुंदीनमनी (वय २३, रा. नागरदिन्नी, ता. कोलार, जिल्हा विजापूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरजेतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्याना पकडण्याच्या सूचना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्याचा शोध घेत होते. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे बाईकची चोरी मादर आणि मुंदीनमनी यांनी केल्याची माहिती मिळाली.
पथकाने दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची बाईक जप्त करण्यात आली.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, शंकर गायकवाड, अभिजीत धनगर, सूरज पाटील, राजेंद्र हारगे, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, चालक सुधीर खोंद्रे, निवास माने, सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.