कवठेमहांकाळमध्ये बालकावर लैंगिक अत्याचार
संशयित नराधम परप्रांतीय तरुणाचा शोध सुरु : कवठेमहांकाळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ शहरात एका परप्रांतीय तरुणाने 6 वर्षाच्या बालकाला कुरकुरे देऊन पैसे देण्याच्या आमिषाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा नराधम प्ररप्रांतीय तरुणविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लोकेन केवलराम कासले (वय 21, रा. कवठेमहांकाळ, मूळ रा. खडवा, जि. खांडवा, मध्यप्रदेश) असे संशयित नराधम तरुणाचे नाव. आहे. याप्रकरणी पीडित बालकाच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी घरी कोणीही नसताना संशयित नराधम तरुण पीडित बालकाच्या घरात गेला. त्याने बालकाला कुरकुरे देऊन पैसे देण्याचे आमिष दाखवले. नंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
पीडित बालकाचे पालक घरी आल्यानंतर त्याने त्रास होत असल्याचे पालकांना सांगितले. पालकांनी त्याला रुग्णालयात नेले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. बालकावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा नराधम कासले याच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडल्यापासून कासले पसार झाला असून पोलीस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.