पोलीस ठाण्याच्या दारातच वर्दीतील 'भाई'च्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन
पुणे : खरा पंचनामा
भाई, दादा, आप्पा यांच्या वाढदिवसांचे सेलिब्रेशन पुणे आणि पिंपरी-चिंचवडील चौका-चौकांत आणि गल्ली-बोळात होताना दिसते. वाढदिवसाच्या नावाखाली करेक्ट 12 च्या ठोक्याला मोठ्याने फटाके वाजवणे, धांगडधिंगा घालण्याचे प्रकार घडत असतात.
पोलिसांना लपवून हा धांगडधिंगा सुरू असतो. पोलीसही अशा धांगडधिगांकडे कानाडोळा करतात. ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहचू नये, यासाठी पोलीस कसोसीचे प्रयत्न करतात. पण, भाई, दादा, आप्पा यांना लाजवेल, असाच प्रकार एका पोलीस शिपायाने करून दाखवला आहे. तोही पिंपरी-चिंचवड परिसरात.
एका पोलीस शिपायाने बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रवीण पाटील, असे उत्साही पोलीस शिपायाचे नाव आहे. पाटीलच्या बर्थडेचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर सगळा प्रताप समोर आला. एकूणच वर्दीतील 'भाईं'च्या सेलिब्रेशनमुळे नागरिकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे प्रवीण पाटीलवर कोणती कारवाई करणार? याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
गुरूवारी (6 मार्च) प्रवीण पाटीलचा वाढदिवस असल्याची माहिती आहे. त्यामुळे बुधवारी रात्री आणि गुरूवारची सुरूवात होताना प्रवीण पाटीलची मंत्रिमंडळी सांगवी पोलीस ठाण्यासमोर जमा होऊ लागली. 'हौशे, नवशे, गवशे' म्हणून पोलीस ठाण्यातील इतर सहकारी सहभागी झाले.
केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली होती. 6 मार्चचे 12 वाजले आणि प्रवीण पाटीलसह त्याचे मित्र मंडळी पोलीस स्टेशनसमोरील रस्त्यावर उतरले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून वर्दीतील 'भाई'च्या सेलिब्रेशन सुरू झाले. मधोमध टेबल टाकून वर्दीतील 'भाई'च्या सेलिब्रेशन सुरू झाले.
उपस्थितीतांमधील दोघांनी फायर गण बाहेर काढली. दुसरीकडे आकाशात, जमिनीवर फटाक्यांची आतिषबाजी होऊ लागली. सध्या व्हिडिओ आणि रिल्सचा जमाना आहे, म्हणल्यावर शूटिंग होणारच... मग काय वर्दीतील 'भाई'च्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन ड्रोनद्वारे शूट करण्यात आले. दिवस उजाडताच वर्दीतील 'भाईं'च्या फॅन्स लोकांनी हे स्टेट्सवर अपलोड केले.
आता सांगवी पोलीस ठाण्यासमोर एखाद्या वर्दीतील 'भाई' ने असा धांगडधिंगा घातल्याचा विचार कुणीही केला नसेल. बर, सगळे पोलीस ठाण्याच्या दारात होत असताना वरिष्ठ अधिकारी काय करत होते? असा प्रश्न पडला आहे. यानंतर वर्दीतील 'भाई'ने हा व्हिडिओ स्टेटसला ठेवला. यामुळे वर्दीचा फायदा लोक कशी घेतात, हे समोर आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.