Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल शिल्पकलेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व राम सुतार यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल शिल्पकलेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व राम सुतार यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन



मुंबई : खरा पंचनामा

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना "महाराष्ट्र भूषण 2024" पुरस्कार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केला. राम सुतार यांचे शिल्पकलेतील कौशल्य सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. देश आणि देशाबाहेरील असंख्य नामांकित शिल्प घडवून सुतार यांनी शिल्पकलेत स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल शिल्पकलेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले. 

सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात महान कलाकृती साकारल्या आहेत. शंभराव्या वर्षी देखील त्यांच्या डोळ्यापुढे केवळ जगातील उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचे ध्येय आहे. त्यांनी अनेक महापुरुषाच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. त्याकरिता त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून आज त्याच अजरामर आणि अप्रतिम शिल्पकृती साकारणाऱ्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा आणि समर्पणाचा सन्मान होत आहे. 

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.