Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांवर गुन्हेगारांचा कोयत्याने हल्ला, पोलीस उपायुक्त आणि एपीआय जखमी

पोलिसांवर गुन्हेगारांचा कोयत्याने हल्ला, पोलीस उपायुक्त आणि एपीआय जखमी



चाकण : खरा पंचनामा 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचोशी - केंदूर रस्त्यावरील चिंचोशी घाटात रात्री सव्वा बाराच्या सुमारास विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सचिन भोसले याला पकडण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी सापळा लावला होता.

त्यावेळेस आरोपी भोसले याने उपायुक्त व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलीस उपायुक्तांनी दोन (काडतुसे) गोळ्या त्यांच्या सर्व्हिस पिस्तूल मधून झाडल्या. त्यावेळेस एक काडतूस आरोपीच्या पायाला लागले व तो जखमी झाला. कोयत्याच्या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड दोघेही जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा बाराच्या सुमारास चिंचोशी ते केंदूर रस्त्यावर चिंचोशी ता. खेड च्या घाटामध्ये मंदिराजवळ विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सचिन चंदर भोसले व मिथुन चंदर भोसले दोघेही रा. खरातवाडी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांना अटक करण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी सापळा लावला होता.

त्यावेळी आरोपीला अटक करते वेळी आरोपी सचिन भोसले याने त्याच्या कडील कोयत्याने पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व प्रसन्न जहऱ्हाड यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला व जखमी केले. पोलीस उपायुक्त पवार यांनी त्यांच्या व सोबतच्या अंमलदाराच्या स्वसंरक्षणार्थ पिस्तूल मधून दोन काडतूस फायर केले.

त्यापैकी एक काडतूस सचिन भोसले याच्या उजव्या पायाच्या नडगीला लागून तो जखमी झाला आहे. आरोपी सचिन भोसले याने पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला व जखमी केले व त्याला अटक करण्याच्या सरकारी कामात त्याने अडथळा निर्माण केला म्हणून त्याच्याविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जहऱ्हाड यांनी पोलिसात फिर्याद दिलेली आहे.

सचिन भोसले याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन भोसले याच्यावर विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.