राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नावही निश्चित
मुंबई : खरा पंचनामा
आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता या अधिवेशनात सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे. दरम्यान, आता उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतोल साधण्यासाठी एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तर दुसरीकडे अजूनही विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब झालेला नाही. या अधिवेशनात या पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.