विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : खरा पंचनामा
आज विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्री उदय सामंत यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी देखील भाजप नेत्याचीच वर्णी लागली, राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे विधानसभेचं उपाध्यक्षपदाचा प्रश्न देखील आता लवकरच सुटणार आहे.
अण्णा बनसोडे हे पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या पाठीशी राहिले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडूनही आले. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.