Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

CET संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही फेक फोनला बळी पडू नये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

CET  संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही फेक फोनला बळी पडू नये
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन



मुंबई : खरा पंचनामा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या संदर्भात एक स्कॅण्डल टास्क फोर्सच्या मदतीने उघडकीस आलं आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर CET चं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संबंधी कोणत्याही फेक फोनला बळी न पडण्याचे आवाहन करणारे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सादर केले.

यावर्षी CET मध्ये अन्य राज्यमध्ये सेंटर घेऊन काही गडबड होत आहे असे लक्षात आल्यानंतर एक टास्क फोर्स तयार करून आपण शोध घेतला. त्यामध्ये गैरप्रकारांच्या संदर्भात एक स्कॅण्डल सापडलं. आपण त्याबाबत पोलिसात तक्रार केली, त्यामध्ये चार जण पकडले गेले. २० - २२ लेखाला एक ऍडमिशन अशा प्रकारे व्यवहार चालला होता. त्यांना सेंटर बिहार, ओरिसा मधलं घ्यायला लावलं. यावर्षी हि सेंटर आपल्याला बंद करता येत नाही. पुढील वर्षी आपण हि दोन्ही सेंटर बंद करू. हे अशा प्रकारे फार मोठं स्कँडल उघडकीस आलं, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

यावेळी पाटील यांनी या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपील केले कि, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर CET चं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संबंधी कोणत्याही फेक फोनला बळी न पडण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.