Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आठवे तपास अधिकारी

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आठवे तपास अधिकारी



बीड : खरा पंचनामा

ऑक्टोबर २०२३ मध्ये परळी येथे झालेल्या पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कमलेश मीना हे या प्रकरणातले आठवे तपास अधिकारी आहेत. या प्रकरणात १७ महिन्यांनंतरही अद्याप या प्रकरणाचा तपास झालेला नाही.

परळी येथील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांचे ता. २१ ऑक्टोबर २०२३ ला अपहरण करण्यात आले. ता. २२ ऑक्टोबरला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावर गंभीर मारहाणीच्या जखमा होत्या. त्यांचा निघृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणाला आता दीड वर्ष होत आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

आमदार सुरेश धस यांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर त्यांच्या पत्नीनेही तपास करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर नवनीत कॉवत यांनी या गुन्ह्याचा तपास अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे सोपविला होता. त्यांच्या मदतीला पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह इतर चौघांचे पथक देण्यात आले.

मात्र, चोरमले यांच्याकडून हा तपास गेवराईचे उपविभागीय अधिकारी राजगुरू यांच्याकडे देण्यात आला. मात्र, राजगुरू आजारी रजेवर गेल्याने आता हा तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला.

कमलेश मीना हे या प्रकरणाचा तपास करणारे आठवे तपास अधिकारी आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.