Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभेनंतर 6 पक्ष झाले मालामाल! भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकावर

लोकसभेनंतर 6 पक्ष झाले मालामाल!
भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकावर



नवी दिल्ली : खरा पंचनामा

कोणतीही निवडणुक लढवणं हा पैशांचा खेळ असतो. यासाठी राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या आधी निधी जमा करीत असतात. त्याच पैशातून मग निवडणुका लढवल्या जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सहा पक्षानी निधीसंकलनात बाजी मारली आहे, निवडणूक खर्च कमी आणि निधी संकलन जास्त झाल्याचे माहिती समोर आली आहे.

भारतीय जनता पार्टी (बीजेपी), तेलुगु देशम पार्टी (टीडीपी), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM), लोक जनशक्ति पार्टी (रामविलास), सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF) आणि ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF) या सहा पक्षाच्या निधीमध्ये निवडणुकीच्या आधी असलेल्या निधीपेक्षा निवडणुकीच्या वेळी जमा झालेल्या निधीत वाढ झाली असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे.

कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्स इनिशिएटिव्ह (सीएचआरआय) ने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हे विश्लेषण निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशीलावर आधारित आहे. 22 प्रमुख राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी असलेल्या निधीत 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवडणूक जाहीर होण्याच्या दिवशी 22 राजकीय पक्षाकडे एकूण 11,326 कोटी रुपयांचा निधी होता. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना यात वाढ होऊन ही रक्कम 7,416 कोटी रुपये जमा झाले. प्रचारात 3,861.6 कोटी रुपये खर्च करण्यात आले. निवडणूक संपल्यानंतर या पक्षाकडे 14,848 कोटी रुपये शिल्लक आहेत.

निवडणुकीच्या आधी भाजपकडे सर्वात जास्त म्हणजे 5,921.8 कोटी रुपये होते. निवडणुकीनंतर भाजपकडे 10, 107.2 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती खूपच कमकुवत आहे. काँग्रेस निवडणुकीच्या आधी 22 पक्षामध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. पण निवडणूक प्रक्रिये दरम्यान काँग्रेस 12 व्या क्रमांकावर आहे.

अन्य पक्षांमध्ये टीडीपीच्या संपत्तीत ६५.४ कोटी रुपये, सीपीएमच्या संपत्तीत ८ कोटी रुपये, एलजेपी-आरव्हीच्या संपत्तीत ९.९ कोटी रुपये, एसडीएफच्या संपत्तीत ७६ लाख रुपये आणि एआययूडीएफच्या संपत्तीत ३.६ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.