"मंत्री माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाली असती तर जनतेचा पैसा खर्च झाला असता"
नाशिक : खरा पंचनामा
राष्ट्रवादी नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कनिष्ठ न्यायालयानं कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिलीय. त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली आहे. मात्र, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देतांना कोर्टाचे महत्वाचं निरीक्षण नोंदवल आहे. यामुळे कोर्टाने असा का निर्णय दिला याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे.. तुकाराम दिघोळे यांच्या मुलीची याचिका नाशिक सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. तसंच माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेला देखील स्थगिती देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टाने दिलासा देतांना महत्वाची टिपण्णी केली. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली. सरकारी कोट्यातून कोकाटे यांनी चार घरं लाटली, त्याप्रकरणी कोकाटे शिक्षा सुनावली होती. दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड असं होतं शिक्षेचे स्वरूप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.