403 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव
सिल्लोड : खरा पंचनामा
भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी ज्या ४०६ जणांना बांगलादेशी संबोधून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यातील एकही बांगलादेशी नाही. बनावट कागदपत्रे देणाऱ्या तिघांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
एकही बांगलादेशी नागरिकाला आम्ही जन्म प्रमाणपत्र दिले नाही, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. असे असताना आपल्यावर उर्वरित ४०३ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी गुरुवारी माजी खा. किरीट सोमय्या यांच्यावर केला.
सिल्लोड तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी शहरातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील ४०६ जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या अनुषंगाने त्यांनी तिसऱ्यांदा गुरुवारी दुपारी १ वाजता सिल्लोडला येथे येऊन पोलिस ठाण्यास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेले षड्यंत्र आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ४० ते ५० वर्षांपूर्वी जन्मलेल्या तालुक्यातील ४०६ लोकांना केवळ आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिले आहे. यात फक्त तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित ४०३ जणांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.