मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला जखमी पोलिसांशी संवाद
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटात संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला.
ही घटना काल (सोमवार, 17 मार्च) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा परिणाम आज शहरात दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अनेकांची वाहने अज्ञातांनी फोडली, त्याचबरोबर काहींच्या गाड्यांना आग लावून पेटवून दिली. या सर्व घटनेवरती संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावेळी जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन 5 निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्यासह अन्य पोलिस आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नागपुरातील कालच्या घटनेत जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आज संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांच्या कामाचं आणि काल परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली त्याबाबत त्यांचं कौतुक केलं, त्याचबरोबर त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.