प्रशांत कोरटकरला उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब
मुंबई : खरा पंचनामा
प्रशांत कोरटकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायायात आज (दि. २१) सुनावणी झाली. यावेळी कोरटकरला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, कोरटकर अद्याप पसार असून त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे आणखी एक पथक नागपूरमध्ये दाखल झाले आहे. नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांची दोन पथके कोरटकरचा शोध घेत आहेत.
इंद्रजित सावंत यांना धमकीप्रकरणी राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर फरार झाला; पण त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र, त्याला कोल्हापूर पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्य सरकारकडून कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयात आमची बाजू ऐकण्यात आली नाही, असेही सरकारने म्हटले होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाने मंगळवारी कोल्हापूर सत्र न्यायालयाला सरकारची बाजू समजून घेत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.