ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन सोलापूर डिविजनअध्यक्षपदी धम्मदीप ओहोळ
सचिव पदी सचिन बनसोडे यांची बहुमताने निवड
सोलापूर : खरा पंचनामा
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन सोलापूर डिविजन अध्यक्षपदी धम्मदीप ओहोळ यांची तर सचिवपदी सचिन बनसोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यकारी समितीच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली. एससी एसटी रेल्वे कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ही समिती काम करते. सोलापूर डिव्हिजन मधील एससी एसटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम करण्यात येईल. कामगारांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी ती लढू असे नूतन अध्यक्ष ओहोळ यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. ओहोळ आणि बनसोडे यांच्या निवडीने सोलापूर डिव्हिजनमधील कामगारांनी दोघांचा सत्कार करून अभिनंदन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.