Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागपूर येथील उपकेंद्राच्या माध्यमातून देशाची न्यायिक विज्ञान क्षमता आणखी सक्षम होईल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

नागपूर येथील उपकेंद्राच्या माध्यमातून देशाची न्यायिक विज्ञान क्षमता आणखी सक्षम होईल 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास



मुंबई : खरा पंचनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शैक्षणिक आणि तंत्रज्ञान विषयक क्षेत्रात अनेक मानदंड प्रस्थापित केले आहेत. आता महाराष्ट्रात नागपूर येथे राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्राची घोषणा करण्यात आली आहे. त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात न्यायिक विज्ञान विषयक उपक्रमात महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रस्तावित विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून देशाची न्यायिक विज्ञान क्षमता आणखी सक्षम होईल, असा ठाम विश्वास वाटत असल्याचे पाटील म्हणाले. 

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूर येथे न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. याचा लाभ देशभरातील फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व कर्मचाऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे राजपत्र शेअर करत याबाबत माहिती दिली. भारतात तीन नवीन ठिकाणी या कॅम्पसची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूर, छत्तीसगढमध्ये रायपूर ओडिशा मधील खोरधा येथे स्थापन केलेल्या कॅम्पसमध्ये राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे कॅम्पसचा समावेश केला जाईल, असे या राजपत्रात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.