माधवनगरमधील हिट अँड रन प्रकरणी गोमेवाडीच्या तरुणावर ड्रन्क अँड ड्राइव्हचा गुन्हा
मद्यधुंद कार चालकाला अटक
सांगली : खरा पंचनामा
सांगली-तासगाव रस्त्यावरील माधवनगर ते खोतवाडी या मार्गावर अलिशान कार चालकाने ‘हिट ॲण्ड रन’ करत थरकाप उडवला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. भरत
याप्रकरणी गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील नितेश किसन पाटील (वय 32) याच्यावर ड्रन्क अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कार चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोघांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तुकाराम पाटील (४५, रा. बुधगाव) आणि पांडुरंग चंद्रकांत खोत (३३ रा. माधवनगर) अशी जखमीची नावे आहेत. गोमेवाडीतील नितेश पाटील हा अलिशान चारचाकी (एमएच ५० एन ८४१२) घेऊन काल सांगलीत आला होता. त्याच्यासोबत एक महिलादेखील होती. तो चारचाकी घेऊन माधवनगर ते बुधगाव या रोडवरून रात्री दहाच्या सुमारास निघाला. भरधाव वेगाने असणाऱ्या चालकाने माधवनगर येथे पांडुरंग खोत यांच्या दुचाकीला (एमएच १० एके ६१३७) धडक दिली. त्यांच्या डाव्या हातापायास दुखापत झाली. त्यानंतर भरधाव वेगाने पुढे गेला. बुधगाव येथे भरत पाटील यांच्या दुचाकीला (एमएच १० एपी ५०१३) धडक दिली. त्यात उजव्या पायास व डोकीस गंभीर मार लागला.
त्यानंतर चारचाकी चालकाच्या मागे जमाव लागला. त्यांनी पाठलाग सुरू केला. अखेर संतप्त जमाव त्याचा पाठलाग करून खोतवाडी येथे अडवले. त्यावेळी तो रक्तबंबाळ अवस्थेत लोकांना दिसून आला. त्याच्यासोबत एक महिलादेखील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जखमींनी रात्री उशीरा तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक श्री. सोनकांबळे अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.