इंजिनियरच्या घरात घुसून 40 तोळे दागिने लंपास
सांगलीतील वानलेसवाडीतील घटना
सांगली : खरा पंचनामा
स्वयंपाक खोलीच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा ऊचकटून चोरट्याने एका इंजिनियरच्या घरातील कपाटातून 40 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. वानलेसवाडी येथील हायस्कूल रोडवरील समाधान चौक परिसरात पहाटे ही घटना घडली. दरम्यान नागोरे यांच्या घरातील दोन्ही कपाटाना कुलूप लावले होते मात्र त्याच्या किल्ल्या उघड्यावरच ठेवल्या होत्या. त्यामुळे चोरट्यानी अवघ्या काही मिनिटात दागिन्यांनावर डल्ला मारून पोबारा केला.
याप्रकरणी संजीव विश्वनाथ नागोरे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्याने श्री नागोरे यांच्या घरातील स्वयंपाक खोलीच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत घरात प्रवेश केला. त्या खोलीतच असलेल्या कपाटातील दागिने आणि त्याच ठिकाणी असलेल्या दुसऱ्या लोखंडी कपाटातील दागिने असा सुमारे ४० तोळे सोन्याचा ऐवज, त्याच कपाटातील 26 हजारांची रोकड आणि हॉलमध्ये लटकवलेल्या पॅन्टच्या खिशातील पाच हजाराची रोकड लंपास केली. चोरीला गेलेल्या दागिनांमध्ये सोन्याचे बटरफ्लाय चेनमधील मनीमंगळसूत्र अंगठ्या, बाळी जोड, बंगाली पेडंट, चेन, कानातील टॉप्स, झुबे, मुडी रिंग, नक्षीकाम असलेले बिलवर आणि अधिक संख्येने वेढण आदींचा समावेश आहे.
दरम्यान चोरटे निघून जाताना नागोरे यांच्या पत्नीला किल्ल्यांचा आवाज आला. त्या जाग्या झाल्या. त्यांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हाताचे, बोटाचे ठसे घेण्यात आले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घरापासून काही अंतरावर जाऊन श्वान तेथेच घुटमळले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकूण ११ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने हे करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.