'वादग्रस्त वक्तव्य टाळा'
मुख्यमंत्र्यांकडून नितेश राणेंना तंबी
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून आला आहे. मंत्री नितेश राणे यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीवरून काही वादग्रस्त विधानं केली होती. त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि काही नेते मंडळींनी औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी केली.
१७ मार्चला नागपूरमध्ये २ गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण ढवळलं. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून तंबी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. "वादग्रस्त विधानं टाळा" अशा सुचना फडणवीसांनी राणेंना दिल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.