Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दहा महिन्यांत ३६ खून, पाच वर्षांत २७६ खून... बीडचा काळा इतिहास !

दहा महिन्यांत ३६ खून, पाच वर्षांत २७६ खून... 
बीडचा काळा इतिहास !



मुंबई : खरा पंचनामा 

बीड जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तब्बल ३६ खून झाले आहेत. त्याचबरोबर, मागील पाच वर्षांत २७६ हत्या आणि ७६६ हत्येचे प्रयत्न झाले असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

हे आकडेवारी सादर करताना मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थिती आणि त्यावर सरकारच्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. बीड जिल्ह्यात २६० जणांकडे शस्त्र परवाने असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातील ९९ परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या गुन्ह्यांचे पुनरावलोकन करताना असे आढळले की, अनेक गुन्हेगारांकडे अधिकृत शस्त्र परवाने आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने ९९ शस्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य मुद्दे -
जिल्ह्यात २६० जणांकडे शस्त्र परवाने आहेत.
९९ परवाने रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू.
जिल्ह्यातील शस्त्रसाठ्यावर प्रशासनाचे लक्ष.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.