"सत्तेचा गैरवापर होत असेल तर सरकारने याची दखल घ्यायला हवी"
बारामती : खरा पंचनामा
राज्यातील काही ठिकाणची परिस्थिती बिघडली आहे. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला. सत्तेचा गैरवापर होत असेल तर सरकारने याची दखल घ्यायला हवी असे मत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.
बीडमध्ये आजच्या सारखी स्थिती कधीही बघायला मिळाली नव्हती. राज्यात सगळीकडेच धार्मिक वातावरण नाही, असे पवार म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, याबाबत चिंता व्यक्त करत पवार यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखण्याची गरज व्यक्त केली.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होतो आहे. एआयचा वापर करू पिके घेतली जात आहेत. एआयमुळे ऊसाला पाणी कमी लागेल. एआयचा कृषी क्षेत्रात वापर वाढवणार असून एआय तंत्रज्ञानाची कृषी क्षेत्राला मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, निवडणूका होत राहतात, पुढच्या निवडणुकांबाबत अजून काही ठरवले नाही. जयंत पाटील पक्ष सोडून जाणार का यासंबंधी शुक्रवारीच बारामतीत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्याचे पवार म्हणाले.
बीडबद्दल बोलताना पवार म्हणाले, बीडमध्ये मी स्वतःलक्ष देत होतो, निर्णय घेत होतो. आता मात्र, परिस्थिती बिघडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जय यांनी भावी वधूसह शरद पवार, प्रतिभा पवार यांची भेट घेतली होती. जय यांच्या साखरपुड्याला जाणार का? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला असता ते भडकले. हा काही प्रश्न आहे का विचारायचा...? असे ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.