Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा

दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा



मुंबई : खरा पंचनामा

दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने पोलिसांच्या पेट्रोलिंग दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा पाय मोडला. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी एका शेफसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार रवींद्र ढामळे (३६) हे एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि. १३) होळीच्या रात्री पावणेदोनच्या सुमारास ते बोरिवली पश्चिमच्या आयसी कॉलनी परिसरात सुमानिया हॉटेलसमोर बीट मार्शल दुचाकीसह थांबवले होते. त्या दरम्यान एका सफेद रंगाच्या कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते गाडीसह खाली पडले. त्यानंतर त्या गाडीने अन्य एका लाल रंगाच्या कारला मागून धडक दिली.

या अपघातामध्ये त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळील हाड मोडले. हॉटेल कर्मचारी आणि इतरांनी ढामळे यांना रस्त्याच्या कडेला बसवले. अधिक चौकशीमध्ये चालकाचे नाव मिथिल उपाध्याय (२६) असून, तो एक शेफ आहे. तो दहिसरच्या आनंदनगरमधील ब्लू डायमंड इमारतीत राहतो. तसेच त्याच्या बाजूला बसलेला चिराग कावा (४६) हा कांदिवली पूर्वच्या समतानगर परिसरात शहापूरजी पालनजी बिल्डिंगचा रहिवासी असून, त्याचीच ती गाडी असल्याचे तपासात उघड झाले. चौकशीत अडखळणाऱ्या या दोघांनीही वाहन चालवताना मद्य प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच मिथिलकडे गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही त्याने गाडी चालवली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमी ढामळेना शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.