उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
मुंबई : खरा पंचनामा
उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाकडे अवघ्या महराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कोणत्या नव्या योजनांची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
तसेच मध्यमवर्गांना दिलासा मिळणार का, शेतकरी वर्गांसाठी काय करणार, तरुणांसाठी कोणत्या योजना राबणार, उद्योगांसाठी कोणते निर्णय घेणार असे एक ना अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहेत. या सर्व प्रश्नांवर सरकार काय करणार याचे उत्तर १० मार्चला मिळणार आहे.
१० मार्च या दिवशी राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे २०२५-२६ चा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करणार आहेत. पण त्या अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुंद्यावर घेरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सत्ताधारी त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखत असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात सद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. बदलापूर येथील अत्याचार प्रकरण, नुकतीच स्वारगेट स्थानकातील बलात्कार प्रकरण, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडच्या नावावर शिक्का मोर्तेब या मुद्यांवर विरोधक आक्रमक होऊ शकतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.