Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

माजी सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश



मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईच्या एका कोर्टाने माजी सेबी प्रमुख माधवी पुरी आणि अन्य ५ लोकांवर शेअर बाजारात कथित घोटाळा केल्याच्या प्रकरणात आणि नियामक उल्लंघनच्या आरोपांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

माधवी पुरी बुच यांचा सेबी प्रमुख म्हणून कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपला आहे आणि त्यांच्या जागी ओदीशाच कॅडरचे आयएएस तुहिन कांत पांडे यांना नवीन सेबी प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असणार आहे.

अमेरिकन रिसर्च फर्म डिंडनबर्गने साल २०२४ च्या अखेर तत्कालीन सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या विरोधात एक रिपोर्ट जारी केला होता, यात रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपच्या विदेशी फंडात सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची हिस्सेदारी होती. तसेच या अहवालात अदानी ग्रुप आणि सेबीच्या दरम्यान साटेलोटे असल्याचा आरोप केला होता.

हिंडनबर्गच्या या आरोपांनंतर माधवी पुरी बुच आणि त्यांचे पतीने प्रतिक्रीया देतान सांगितले की हे सर्व आरोप निराधार आहेत. त्याच बरोबर माधवी बुच यांनी आम्ही कोणतीही माहीती लपविली नसल्याचे सांगत आरोपात काहीही तथ्य नसल्याचे देखील म्हटले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.