Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाची जबाबदारी आता पोलिस निरीक्षकांवर

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाची जबाबदारी आता पोलिस निरीक्षकांवर



मुंबई : खरा पंचनामा

प्रार्थनास्थळांवर सरसकट भोंग्यांची परवानगी दिली जाणार आहे. यापुढे प्रार्थनास्थळावरील भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातील नियमांचे पालन होत आहे की नाही, याच्या तपासणीची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांवर सोपविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.११) विधानसभेत दिली.

दरम्यान, धार्मिक स्थळावरील भोंगे आपण बंद करू, पण दररोज सकाळी वाजणाऱ्या ९ च्या भोंग्याचे काय करायचे ? असा खोचक सवाल करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंग्यांसदर्भात नियमावली असली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे मान्य केले. मात्र, आगामी काळात प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. या नियमांच्या तंतोतंत अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकांवर सोपविण्यात येईल. पोलिस निरीक्षकांनी प्रार्थनास्थळी जाऊन भोंग्यांची परवानगी घेतली का, नियमांची अंमलबजावणी होते का, याची पाहणी करण्याचे निर्देश दिले जातील.

येत्या काळात भोंग्यांच्या वापराव्या नियमांचे तंतोतंत पालन आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. कायद्यानुसार अधिक डेसिबलपेक्षा हे भोंगे वाजत असतील, तर प्रदूषण नियमक मंडळ कारवाई करेल. कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देता येणार नाही. तर निश्चित कालावधीसाठी परवानगी दिली जाईल. मात्र, ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे उल्लंघन केल्यास पुन्हा कधीच परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.