"लाडक्या बहिणींना पैसे देता, वीज मोफत देता.. मग पिणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दोन बाटल्या द्या"
बंगळूरू : खरा पंचनामा
बिहार आणि गुजरातसह भारतातील अनेक राज्यांमध्ये दारूबंदी आहे. ज्या राज्यांमध्ये दारूचे प्रमाण जास्त आहे, तिथे दारू विभागाकडून राज्य सरकारच्या महसुलात मोठी रक्कम येते.
गांधी तत्वज्ञानानुसार, कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी दारू पिणे योग्य नाही. पण सध्याच्या काळात दारू पिण्याचा ट्रेंड इतका वाढला आहे की १०० पैकी ७० टक्के लोक मद्यपान करतात. भारतातील अनेक भागात निवडणुकीच्या निमित्ताने दारू वाटण्याचा ट्रेंड आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत जनता दल (धर्मनिरपेक्ष) ज्येष्ठ आमदार एमटी कृष्णप्पा यांनी मागणी केली आहे की, 'दारू पिणाऱ्या प्रत्येकाला सरकारने दर आठवड्याला प्रत्येकी दोन बाटल्या दारू द्यावी'. सिद्धरामय्या सरकारने त्यांच्या ५ हमी अंतर्गत पुरुषांना दारूच्या दोन बाटल्या द्याव्यात.
एमटी कृष्णप्पा विधानसभेत म्हणाले की, मला चुकीचे समजू नका, पण जेव्हा तुम्ही लाडक्या बहिणींना २००० रुपये मोफत देता, जेव्हा तुम्ही मोफत वीज देता, तेव्हा ते आमचे पैसे असतात, नाही का? म्हणून त्यांना सांगा की जे पितात त्यांनाही आठवड्यातून दोन मोफत बाटल्या द्याव्यात.
हे एक वेळ मान्य करु की, जर तुम्हाला दरमहा पैसे देणे शक्य नसेल, तर फक्त दोन बाटल्या द्याव्यात. आपण हे सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे करूया. असं ते म्हणाले आहेत. आमदाराच्या या अजब मागणीवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.
जेडीएस आमदाराच्या या मागणीवर काँग्रेसचे केजे जॉर्ज म्हणाले, 'तुम्ही निवडणूक जिंका, सरकार स्थापन करा आणि ही योजना राबवा. आमदारांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष यूटी खादर म्हणाले की, जर दारू मोफत दिली तर काय होईल याची कल्पना करा. दोन बाटल्या मोफत देण्याच्या तुमच्या सूचनेपूर्वीच आम्ही कठीण परिस्थितीत आहोत. मग अध्यक्षांनी विचारले, इथल्या २२४ लोकांपैकी किती लोक दारू पीत नाहीत?
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.