राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब !
नांदेड : खरा पंचनामा
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत होता.
यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. 3 मार्चला संध्याकाळनंतर फोटो व्हायरल झाल्यानंतर 4 मार्च रोजी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता मंत्रिपदाची झूल जाताच धनंजय मुंडेंचा मानपानही गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडेंचा फोटो गायब झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या रविवारी नांदेडमध्ये येत आहेत. त्या निमित्ताने नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आलीय. मात्र या बॅनरवरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अजिबातच स्थान दिलेलं नाही. बॅनरवर मुंडे यांचा फोटो तर सोडाच साधा उल्लेख देखील कुठे दिसेनासा झालाय.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्यापासून अंतर ठेवलंय की काय? अशी चर्चा रंगलीय. तसे पाहिलं तर नांदेड आणि परळीचे अंतर अत्यल्प आहे. त्यामुळे यापूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमात धनंजय मुंडे अग्रस्थानी असत. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना खड्यासारखे बाजूला केले की काय? अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.