महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 'ती' कर्तव्यावर असतांना धक्काबुक्की
ठाणे : खरा पंचनामा
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी आपल्या गर्दीवर हात उचळणाऱ्या महिला बाऊन्सरवर साधा गुन्हा देखील दाखल केला नाही.
शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमिनीचा वाद निर्माण झाला होता. देसाई गावातील शेतकरी आणि गावाबाहेरील महिलांमध्ये वाद निर्माण झाला होता. गावात गावाबाहेरील महिला बाऊन्सर आल्या असल्याची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना टोल फ्री नंबर वरून दिली होती. यानंतर महिला पोलीस कर्मचारी देखील घटनेच्या ठिकाणी कर्तव्यावर पोहोचल्या होत्या. मात्र गावाबाहेरून आलेल्या महिलांनी थेट शेतकऱ्यांना दमदाटी करून आपली दादागिरी थेट पोलिसांवर दाखवत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे. या प्रकाराच्या व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्या असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारानंतर महिला वर्गातून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात सरकारकडून विविध प्रकारच्या योजना महिलांसाठी राबविल्या जात आहेत. सरकारच्या योजना राज्यात चर्चेला देखील येत आहेत. मात्र एकीकडे योजना सुरु ठेवून दुसरीकडे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडायची का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर पोलीस गुन्हा दाखल करून शासन करणार का ? याकडे जनतेचं लक्ष लागल आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.