गौरव आहुजाने माफी मागितलेले 'शिंदे साहेब' नेमकं कोण?
मुंबई : खरा पंचनामा
भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
आहुजाने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी केलेल्या कृत्याची माफी मागताना 'शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो.' असं विधान केल्यानंत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झालं आहेत. आहुजावर राजकीय बडा वरदहस्त असल्याचे बोललं जात आहे.
आपचे नेते विजय कुंभार यांनी ट्विट करत शिंदेंवर तोफ डागली आहे. गौरव आहुजा हा फक्त देशाची, जनतेची माफी मागत नाहीय तर तो खासकरून शिंदे साहेबांचीही माफी मागत आहे. हे शिंदे साहेब नेमके कोण, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का, या शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आहे का, या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का असं अनेक प्रश्न नेते कुंभार यांनी ट्विट करत उपस्थित केले आहेत.
'मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझ्याकडून जी पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं. मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो. मला एक संधी द्या.. अशी काही तासांतच मी पोलिसांना शरण जाणार आहे.
तसेच, मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिस ठाण्यात हजर होणार आहे. त्यामुळं माझ्या परिवाराला या प्रकरणी कोणताही त्रास देऊ नका.. अशी विनंतीदेखील या तरुणाने केली आहे. असं वक्तव्य गौरव आहुजाने व्हिडीओ शेअर करत केलं होते.
गौरव आहुजाला नेमकी कोणत्या शिंदे साहेबांची माफी मागण्याची गरज भासली? "शिंदे साहेब" नेमका कोण आहेत? का गौरव आहुजाने माफीनाम्यात "शिंदे साहेबांचे" नाव घेतले? असा सवाल उपस्थित करत "शिंदे साहेब" आणि गौरव आहुजामधील नक्की काय संबंध आहे ते बाहेर आलं पाहिजे ! अशी मागणी त्यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.