माझ्या आईवर खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही!
मुंबई : खरा पंचनामा
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वागण्याला कंटाळून त्यांच्या आई परळीत न राहता नाश्रा गावाला जाऊन राहत असल्याचा दावा केला.
यावर धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त करतानाच माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे, अशा शब्दात इशारा दिला. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या, अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटींच्या खंडणीचे प्रकरण आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या खात्यामार्फत झालेल्या दोनशे कोटींच्या घोटाळा प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध दाखवून त्यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडण्यात धस यांची महत्वाची भूमिका होती.
वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत. तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले.
माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केल्या गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.