अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन
वाळव्यात होत्या प्रांताधिकारी
पुणे : खरा पंचनामा
कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ख्याती मिळविलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे (वय-४८) यांचे आज सोमवार (दि.२४) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, वाळवा तसेच हवेली येथील प्रांताधिकारी, महसुल विभागात उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. अपर जिल्हाधिकारी म्हणून त्या पदोन्नतीने पीएमआरडीएमध्ये नियुक्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.