Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्कचे ते अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार? खासगी चालकाकडून दारू तस्करी : विभागीय उपायुक्त कार्यालयात खळबळ

राज्य उत्पादन शुल्कचे ते अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार?
खासगी चालकाकडून दारू तस्करी : विभागीय उपायुक्त कार्यालयात खळबळ 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

खासगी वाहनाला दिवा लावून दारूची तस्करी करताना सैन्य दलातील निवृत्त कर्मचारी आणि खात्यातीलच अधिकाऱ्याचा खासगी चालक यांना अटक करण्यात आली. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान तो खासगी चालक खात्यातीलच निवृत्त झालेल्या तसेच एका कार्यरत अधिकाऱ्यांकडे चालक म्हणून काम करत होता. ते अधिकारी आणि विद्यमान अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या घटनेमुळे कोल्हापूर येथील विभागीय उपायुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. 

आलिशान खासगी कारला अंबर दिवा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या शासकीय गणवेशात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा तोतया कर्मचारी आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली.

तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी दोघांची नावे आहेत. पथकाने अडीच लाखांची दारू, २५ लाखांची दोन वाहने, मोबाइल असा एकूण २७ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी पहाटे नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत करण्यात आली.

तोतया कर्मचारी ढेरे हा कोल्हापुरातील विविध शासकीय अधिकाऱ्यांकडे खासगी चालक म्हणून दहा वर्षांपासून काम करीत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांकडेही त्याने काम केले आहे. सध्या तो राज्य उत्पादन शुल्कमधील अधिकाऱ्याकडे काम करत होता.

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून ढेरे खात्यातील अधिकाऱ्यांकडे काम करत होता. तो कधीपासून दारूची तस्करी करत होता याचा तपास आता करावा लागणार आहे. तसेच त्याच्या या धंद्यात तत्कालीन अधिकाऱ्यांचे त्याला पाठबळ होते का याची चौकशी होणार की नाही? तसेच यात सहभाग आढळणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील संबंधित लोकांचीही चौकशी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या घटनेमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.