"मी सर्वच पक्षांच्या संपर्कात असतो. त्यामुळे कोठे काय चालले आहे ते कळते"
सोलापूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यानंतर अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली. अजित पवारांचे नेतृत्व त्यांनी स्विकारले. शरद पवारांचे एक एक नेते अजित पवारांच्या तंबूत दाखल झाले. अगदी छगन भुजबळांपासून दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत सर्वच जण अगदी झाडून अजित पवारांकडे गेले.
पण अशा स्थितीत ही जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यानंतर त्यांना अनेक वेळा अजितदादांनी चुचकारलं. पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्या स्थितीत ही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. संघटना नव्याने बांधली. लोकसभेत तर पक्षाला जबरदस्त यश मिळालं. मात्र विधानसभेला वारं फिरलं. त्यानंतर पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली.
जयंत पाटील यांच्या मतदार संघात भाजपच्या बड्या नेत्यांचे येणे जाणे वाढले. नितीन गडकरींनीही हजेरी लावली. त्यामुळे तर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशा ही चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावर आता जयंत पाटील यांनी थेट भूमीका घेतली आहे. मी सर्वच पक्षांच्या संपर्कात असतो. त्यामुळे कोठे काय चालले आहे ते कळते. पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी ही मिश्किल टिप्पणी केली आहे.
जयंत पाटील हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारां बरोबर बोलत होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत पाच दिवस झाले आहेत, असे सांगितले जाते. पण सत्य काय आहे हे समजायला माहित नाही असे जयंत पाटील म्हणाले. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहाला अवगत करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळात कोण आहे नाही, याची माहिती देणे गरजेचे असल्याचं ते यावेळी म्हणाले. सध्या तरी सभागृहाला याबाबत माहिती नसल्याने राजीनाम्याबाबत आपण साशंक आहोत. असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कसे शीतयुद्ध सुरू आहे हे सांगितलं. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यात जयंत पाटील यांनी टीका केली आहे. शिंदे सरकारच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाकाच फडणवीसांनी लावला आहे अशी चर्चा आहे. मात्र असं काही झालेलं नाही असंही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पण असं असलं तरी रोज स्थगितीच्या बातम्या बाहेर येतच आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीसांतील शितयुद्ध लपून राहीलेले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.