Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"काही चमत्कार होईल, हे स्वप्न पडायचंही आता बंद झालंय"

"काही चमत्कार होईल, हे स्वप्न पडायचंही आता बंद झालंय"
मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५' कार्यक्रमात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. आमदारांच्या संख्येचा उल्लेख करत जयंत पाटलांनी केलेल्या एका विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांनाही हसू आवरता आले नाही. देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांना पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

जयंत पाटील म्हणाले, "आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले व्यक्तिमत्व आणि स्वभाव हा फार गोड आहे. कितीही शत्रूत्व कोणाबरोबर असले, तरीही तुमचा गोडवा कमी होणार नाही. आणि तो होऊही नाही, असं मला वाटतं."

"विरोधकांशी संवाद राहावा, असं पहिलंच भाषण आपण केलं. विरोधकांशी संवाद ठेवला तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते. विरोधकांची संख्या कमी आहे. ४०-५० लोकं आहेत. त्यामुळे पूर्वी समोर असे बसलेले असायचे. आता आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत दिलं आहे."

"महाराष्ट्राची प्रगती ६-७ टक्क्यांनी न होता, महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढावी. महाराष्ट्रातील दळणवळण वाढावं, यासाठी या पाच वर्षांची फार कमी लोकांना संधी मिळते. मी समजतो की, महाराष्ट्रात शरद पवारांनी ही संधी मिळाली. त्यावेळी प्रचंड वेगाने विकास झाला."

"आम्ही तर काय ४०-५० लोकं आहोत. त्यामुळे आमचं काय होईल आणि काही चमत्कार होईल, हे स्वप्नही आता पडायचं बंद झाले आहे. (हे ऐकून देवेंद्र फडणवीस हसले आमि म्हणाले, 'नानाभाऊ पटोलेंना अजूनही स्वप्न पडते.) मी चर्चा करतो त्यांच्याशी. पण, आपल्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची साथ दिसतेय, त्यामुळे एक नंबरचं राज्य करायला माझ्या शुभेच्छा", अशा शब्दात जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.