गेल्या १० वर्षांत ED कडून १९३ नेत्यांवर गुन्हे दाखल; शिक्षा फक्त दोघांनाच
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची २०१४ पासून सत्ता आल्या नंतर ईडीने राजकीय नेत्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. दरम्यान अर्थ आणि महसूल मंत्रालयाने अलीकडेच संसदेत याबाबत माहिती दिली आहे.
ईडीने गेल्या १० वर्षांत आजी माजी खासदार, आमदार, एमएलसी, राजकीय नेते आणि राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींविरुद्ध १९३ गुन्हे नोंद केले आहेत. मात्र गेल्या १० वर्षांत फक्त दोघांनाच शिक्षा झाल्याचं म्हटलं आहे. केरळचे खासदार (एमपी) एए रहीम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली.
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली असून त्यांनी सांगितले की, मनी लाँड्रिंगविरोधी संस्थेने आजी-माजी आमदार-खासदार तसेच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत; परंतु त्याचा राज्यनिहाय तपशील उपलब्ध नाही. एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान या श्रेणीतील व्यक्तींविरुद्ध ईडीने १९३ गुन्हे दाखल केले. २०१६-१७ आर्थिक वर्षात एक आणि २०१९-२० मध्ये दुसऱ्या प्रकरणात दोषींना शिक्षा झालेली आहे. त्यात कोणी निर्दोष सुटले नाही, असे त्यांनी सांगितले.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात आजी-माजी आमदारांविरुद्ध ईडीने सर्वाधिक ३२ खटले दाखल केले. ईडी विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे प्रकरणे हाती घेते. यात राजकीय संलग्नता पाहिली जात नाही, असे उत्तरात नमूद केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.