तिसरीतील मुलीवर शेजारच्या वृद्धाकडून अत्याचार
मिरज तालुक्यातील घटना ; नराधम वृद्धास अटक
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील एका गावातील तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ६५ वर्षीय नराधम वृद्धास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाष उर्फ भैय्या गोविंद कांबळे असे त्या नराधमाचे नाव आहे. २६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडितेच्या आजीने ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेला ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतले आहे. ती मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीत शिकते. संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो. तो मोलमजुरी करत असून २६ फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती. संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलवून घेतले. तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडिता घरी गेली. तिला त्रास जाणवू लागल्याने रडू लागली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी हा प्रकार समोर आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.