बनावट कागदपत्राद्वारे हॉटेलमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकास अटक
सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कायदेशीर परवान्याशिवाय भारतात घुसखोरी करत सांगलीत बनावट कागदपत्राद्वारे हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली.
त्या घुसखोराने अमीर शेख या नावाने बनावट कागदपत्रे तयार केले असून त्याचे मूळ नाव अमीर हुसेन असे आहे. शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
शहरचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक शहरात गस्तीवर होते. आज सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एक जण संशयितरीत्या मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अमीर शेख (रा. दिल्ली) असे सांगितले. शेख याने आधार कार्डही दाखवले त्यावर एबीसी नजदीक आंबेडकर चौक, मुनरीका गाव जेएनयू दक्षिण-पश्चिम दिल्ली असा पत्ता होता. परंतु त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले.
दरम्यान, पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीर रित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्राशिवाय भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.