"तुमचा रात्रीशी संबंध नाही"
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. विविध क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा उल्लेख करताना त्यांनी कृषी क्षेत्रात होत असलेल्या बदलांविषयी माहिती दिली. कृषी क्षेत्रात एआयचा वापर वाढवल्याने उत्पादन वाढणार असल्याचं ते म्हणाले. याबाबत उदाहरण देत असताना त्यांनी उसाच्या उत्पादनाविषयी माहिती दिली. ही माहिती देत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मिश्किल संवादही झाला.
"मी विश्वासाने सांगतो AI तंत्रज्ञानच्या काळात कृषी क्षेत्राला मी नवी संजीवनी देईन. त्यातून महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होईल. सभागृहातील शेतकऱ्यांनी पाहिलंय की पूर्वी उसाचं टनेज ६०-७० . होतं पण जयंतराव आता १०० च्या पुढे टनेज गेलं की नाही? आज टनेज वाढल्यानंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. १४५ पर्यंत टनेज वाढलं आहे, पण सांगताना १०० सांगितलं. कारण परत म्हणला की हा दिवसा बोलतोय की रात्री? म्हणून म्हटलं १०० च्या पुढे टनेज गेलं", अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहाला देत होते. तेवढ्यात शेजारी बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचा रात्रीशी संबंध नाही."
त्यावर अजित पवारही मिश्लिकपणे म्हणाले की, "हे तुम्हाला माहितेय. त्यांना नाही माहीत." या दोघांच्या या संवादातून सभागृहात एकच हशा पिकला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.