Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आर्टिलरी सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची कीड, 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, सीबीआयची मोठी कारवाई

आर्टिलरी सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची कीड, 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, सीबीआयची मोठी कारवाई

नाशिक : खरा पंचनामा

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती. भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सीबीआयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी तपासातून सीबीआयच्या 'एसीबी'च्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची चर्चा रंगली होती.

आता नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवानांचे बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या ऑडीटर, अकाऊंट, क्लार्क आशा 15 अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या 11 प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.