जिल्ह्यातील ढाबे, हॉटेल्सवर धडक कारवाई
25 तळीरामांसहा 11 ढाबे चालकांवर गुन्हे : अधीक्षक पोटे
सांगली : खरा पंचनामा
बियर बारचा परवाना नसताना मद्य प्राशन करण्यास देणाऱ्या ढाबे, हॉटेल चालकांवर धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. सहा दिवसात जिल्ह्यात 11 ढाबे, हॉटेल चालकांवर कारवाई करत 25 तळीरामांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
भरमसाठ शुल्क भरून बियर बार चालवणाऱ्यांवर अशा ढाबा, हॉटेलचा परिणाम होत आहे. काही ढाब्यांवर मद्य प्राशन करण्यास संबंधित चालक तळीरामांना परवानगी देतात. त्यामुळे अनेकजण वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून ढाब्यांवर ते प्राशन केले जाते. याचा फटका बियर बार चालकांना बसत आहे. व्यवसाय होत नसल्याने जिल्ह्यातील 50 बार, देशी दारू दुकाने. बियर शॉपी यांनी परवाना नूतनिकरण शुल्क भरलेले नाही. शिवाय बेकायदा मद्य प्राशन करण्यास ढाबा चालक परवानगी देत असल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची तक्रार संबंधितानी केली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाबे, हॉटेल यांच्यावर दि. 1 एप्रिलपासून कारवाई सुरु केली आहे. दि. 6 एप्रिलपर्यंत 11 ढाबे, हॉटेल्सवर कारवाई करत तेथे बेकायदा मद्य प्राशन करणाऱ्या 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई केलेल्यामध्ये हॉटेल महाराजा (गट नं. 1050/2, बेळंकी ता. मिरज), हॉटेल आबा (बेळंकी, ता. मिरज), हॉटेल पिक स्टार (जुन्या सूतगिरणी मिरज रोड, राधिका नगरी शेजारी, मिरज), हॉटेल राजेशाही गार्डेन, (मिरज-कृष्णाघाट रोड, मिरज), हॉटेल सन शाईन (सांगली), हॉटेल अयोध्या (मालगाव), हॉटेल मटनावळ (इनामधामणी रोड, ता. मिरज), हॉटेल देवा (बेळंकी ता. मिरज), हॉटेल मल्हार (भाळवणी, ता. खानापूर), हॉटेल मूनलाईट (कुंडल, ता. पलूस), स्वराज्य ढाबा (धामणी रोड सांगली).
ढाबे, हॉटेल्स येथे बेकायदा मद्य प्राशन करणाऱ्यांसहा ते पिण्यास परवानगी देणाऱ्या ढाबे, हॉटेल्स यांच्यावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधीक्षक पोटे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.