Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समाज कल्याणच्या सहायक आयुक्ताला लाच घेताना रंगेहात अटकबचत गटाचे बिल काढण्यासाठी घेतले 40 हजार : सांगली एसीबीची कारवाई

समाज कल्याणच्या सहायक आयुक्ताला लाच घेताना रंगेहात अटक
बचत गटाचे बिल काढण्यासाठी घेतले 40 हजार : सांगली एसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

बचत गटाने घेतलेल्या टेंडरचे बिल काढण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना समाज कल्याण विभागाच्या सांगलीतील सहायक आयुक्ताला रंगेहात पकडून अटक करण्यात आली. गुरुवारी दुपारी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

नितीन उषा संपत उबाळे (वय ४६, सध्या रा. खरे क्लब हाऊस, साफल्य बंगला, विश्रामबाग सांगली, मुळ रा. लक्ष्मी हौसींग सोसायटी, ट्रॅगंल चाळीच्या पाठीमागे साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदरांच्या बचत गटाने समाज कल्याणचे एक टेंडर घेतले आहे. त्याचे बिल काढण्यासाठी बिलाच्या 10 टक्के रक्कम म्हणजे 40 हजार रुपये उबाळे याने तक्रारदारांकडे मागितली. लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दिली होती.

विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यावर उबाळे याने 40 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी एसीबीने सांगलीतील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील त्यांच्याच कक्षामध्ये 40 हजारांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक किशोर कुमार खाडे, विनायक भिलारे तसेच प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सोमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.