मुख्यमंत्री फडणवीसांना नागपूर खंडपीठाचं समन्स
नागपूर : खरा पंचनामा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावलं आहे. काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसबा मतदारसंघातील निकालाबाबत खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. फडणवीसांसह मते, भांगडिया यांनाही कोर्टाने समन्स बजावले आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बाजावले आहे.
काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
निवडणुकीत प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतींचा वापर केल्याचा निवडणूक याचिकेत दावा करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार मोहन मते आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर विधानसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार बंटी भांगडिया यांनाही कोर्टाने समन्स बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.