देवेंद्र फडणवीसांचा खास मोहरा मुख्यमंत्री कार्यालयात, प्रवीण परदेशींची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती
मुंबई : खरा पंचनामा
निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात दाखल होणार आहेत. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रवीण परदेशी हे सध्या 'मित्रा' या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत. परदेशी हे काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सुद्धा कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते मर्जीतील अधिकारी मानले जातात.
प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. त्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच समाधान राहिलेले आहे. कोरोना काळाच्या आधी त्यांनी महापालिका आयुक्त म्हणून देखील काम केले आहे. आता निवृत्तीनंतर प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.