Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

EVM हॅक होऊ शकतं, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा दावा

EVM हॅक होऊ शकतं, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा दावा

दिल्ली : खरा पंचनामा

अलीकडेच अमेरिकन उद्योजक अब्जाधीश आणि ट्रम्प यांच्या सरकारमधील मंत्री एलॉन मस्क यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं. यानंतर आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी ईव्हीएमबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, असा दावा त्यांनी केला आहे.
तुलसी गॅबार्ड यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या म्हणता दिसत आहेत की, "आमच्याकडे पुरावे आहेत की, बऱ्याच काळापासून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. ते मते बदलू शकतात. आता देशभरात बॅलेट पेपर अनिवार्य करण्याची गरज आहे, जेणेकरून मतदार अमेरिकन निवडणुकांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवू शकतील."

लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निःपक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात यासाठी निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी वारंवार विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. ईव्हीएमवर विरोधकांनी अनेकदा शंका व्यक्त केली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.