वाहतूक पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
नागपूर : खरा पंचनामा
गोंदिया जिल्ह्यातील देवरी टोल नाका चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या एका वाहतूक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने आज (शुक्रवार) रंगेहात पकडले आहे. योगेश खैरकर असे या निरीक्षकाचे नाव असून सध्या तो देवरी पोलिसांच्या ताब्यात आहे.
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या निरीक्षकामार्फत अनेक वाहन चालकांकडून पैसे घेतले जात होते. अशाच तक्रारींची दखल घेत एसीबी नाशिकचे पथक त्याच्या मागावर होते. आज एका डमी वाहन चालकामार्फत हा सापळा लावण्यात आला. यात तो निरीक्षक लाच घेताना रंगेहात अडकला. प्रोसेसिंग फिच्या नावावर त्याने ही रक्कम मागितल्याची माहिती असून, लवकरच या प्रकरणाच्या तपासात अधिक तपशील उघड होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.