गर्भवती मृत्यूप्रकरणाचा अहवाल सादर; प्रथमदर्शनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी
पुणे : खरा पंचनामा
आरोग्य उपसंचालकाच्या अहवालात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचार न केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती.
या प्रकरणी या समितीने अहवाल सादर केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य उपसंचालकाच्या समितीने सादर केलेल्या या अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्याने आता येत्या काळात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसमोरील अडचणी वाढणार आहेत.
दीनानाथ रुग्णालयात मृत्यू झालेल्या तनिषा भिसे प्रकरणी भिसे कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं आहे. डॉ. घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांचा पत्रातून केला आहे. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.